माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे
कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे
बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे
गमावतो ना कधीच संधी हपापलेला विचित्र प्राणी डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे
वाचकांच्या भेटी