माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली
तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली
ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला औलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली?
घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे भासे असे जसे की, दमछाक दूर झाली
घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली
वाचकांच्या भेटी