माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
अल्याड डोंगर पल्याड खाई, डचमळतो मी मधात आहे रुतेचना ही नखे कुठेही, सदा घसरतोच हात आहे
कुटाळकीच्या समोर सज्जन समाज सारा हरून गेला तसाच मीही क्रमाक्रमाने सदैव खातोच मात आहे
बरेच काही लिहून गेलो, कुठे दखल घेतलीय माझी? जरी तयांनी जरा खरडले, तुफान चर्चा जगात आहे
खुशाल करती टवाळखोरी बघून कोणास पाठमोरा समोर येता मुखावरी मुख हसून हॅलो प्रघात आहे
वाचकांच्या भेटी