माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
ठेविले अनंते । तैसे कैसे राहू । तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥
इथे मंबाजीचे । सत्तांध वारस । माझे गळी फास । टाकताहे ॥२॥
आयातुनी माल । शत्रू देशातला । माझ्या सृजनाला । बुडविती ॥३॥
माझ्या निर्यातीची । वाट अडविती । जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥
गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? । त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥
लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय । आणि हयगय । पोशिंद्याची ॥६॥
- गंगाधर मुटे "अभय" ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ १५/०७/२०१६ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचकांच्या भेटी