गंगाधर मुटे यांनी सोम, 04/01/2016 - 09:17 ह्यावेळी प्रकाशित केले.
स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका
एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल
पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल
खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल
शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव
तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल ?
आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा
म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा
स्वदेशीचे ढोंगधतूरे; खातोस विदेशातली दाल
छल कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता
'अभय' जाहली जर भूमिकन्या, मरशील लाथा खाता
तुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल
- गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बुलडाणा : चार/एक/सोळा ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ By: एबीपी माझा वेब टीम | Saturday, 26 March 2016 1:10 PM
नागपूर : नुकतंच नागपूर इथं अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन पार पडलं. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आव्हानांवर यावेळी साहित्यातून प्रकाशझोत टाकण्यात आला.
शेतकरी नेते शरद जोशी यांना अभिवादन करून या संमेलनाला सुरुवात झाली. 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह इथं हे संमेलन पार पडलं.
नव साहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या साहित्य संमेलनाचा उद्देश होता. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक माजी प्राचार्य रा. रं. उर्फ रावसाहेब बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, शेतकरी साहित्य चळवळीचे अध्यक्ष गंगाधर मुटे, राम नेवले, संध्या राऊत, शेतकरी नेते वामनराव चटप उपस्थित होते.
यावेळी राजीव खांडेकर यांनी गंगाधर मुटे यांच्या ‘स्वदेशीचे ढोंगधतुरे’ या कवितेचं वाचन केलं.
नव्या कवी, लेखकांनी कोणत्या प्रकारे व्यक्त व्हायला हवं, हे शरद जोशींनी सांगितलं होतं, तेच गंगाधर मुटेंच्या कवितेतून जाणवंल्यामुळेच ही कविता भावल्याचं राजीव खांडेकर यांनी सांगितलं.
युगात्मा परिवार मोबाईल अॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करत नाही.
त्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.
मोबाईल Hang होणार नाही.
युगात्मा परिवार मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play) उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व डाउनलोड करण्यासाठी http://www.baliraja.com/app या लिंकवर क्लिक करा.
प्रतिक्रिया
गंगाधर मुटे
स्वदेशीचे ढोंगधतुरे : नागपुरी तडका
काव्यवाचन : श्री राजीव खांडेकर, मुख्य संपादक, एबीपी माझा
कवी : गंगाधर मुटे
फ़ेसबूकवर VDO बघण्यासाठी लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/videos/1202161426475210/