आला आला चड्डीवाला
आला आला टोपीवाला
त्याने घातलाय घाला
त्याची नजर तिरकी फ़िरली
ग बाई माझ्याsssss
शेताला दिठ लागली ॥धृ०॥
होती ज्वानीत आली ज्वारी
लक्ष्मी येतांना दिसलिया दारी
धनी खुशीत नाचलाय भारी
म्हणे भरतील कोठ्या-वखारी
नजर पडली बुहार्याची
टोपीवाल्या लफ़ंग्याची
अन
ज्वारीला लेव्ही लागली ॥१॥
सातासालात एक साल आलं
शेतचांदण कापसात न्हालं
झाड बोंडांनी लगडून गेलं
जणू दुर्भाग्य खरडून नेलं
यानं केली निर्यातबंदी
आणली बाजारात मंदी
अन
कापसाची वाट लागली ॥२॥
केवळ मतांच्या जोगव्यासाठी
अभय दाबतात आमचीच घाटी
धनी राबून मरमर मरतो
कधी म्हणतोय आत्महत्त्या करतो
गेला जुना टोपीवाला
आला नवा चड्डीवाला
अन
आल्याआल्याच नरडी दाबली ॥३॥
- गंगाधर मुटे
प्रतिक्रिया
गंगाधर मुटे
सुरेख कविता.