शेतकरी जीवनाचा सारिपाट - समिक्षा

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture
प्रकाशीत: 
- - - - - - - -दैनिक "प्रहार" मध्ये २ मार्च २०१४ ला श्री रमेश पांचाळ यांनी "वांगे अमर रहे’ पुस्तकाची केलेली समिक्षा 

शेतकरी जीवनाचा सारिपाट 

या पुस्तकात २३ लेख असून प्रत्येक लेखाचा केंद्रबिंदू हा शेतकरी समाजच आहे. शेतीसंबंधीची खडान्खडा जाण असल्यामुळेच लेखकाच्या भाषेला एक वेगळीच धार आलेली आहे. शेतक-याच्या आत्महत्या, 
त्याच्या समस्या, गरजा, राहणीमान, चालीरिती इत्यादीसंबंधी कोणाला अभ्यास 
करावयाचा असेल, ते खूप उपयुक्त ठरेल, असे आहे.

          ‘अण्णा, कायदा आणि विधेयके आणली म्हणजे प्रश्न चुटकीसरशी सुटतात, असे तुम्हाला वाटत असेल तर मग या वर्ध्याला. हा जिल्हा महात्मा गांधीजींच्या पावन स्पर्शाने पवित्र झाल्यामुळे फार पूर्वीपासून येथे संपूर्ण जिल्हाभर कायदेशीर दारूबंदी आहे. पण याच जिल्ह्यात पावलापावलांवर हवी तेवढी दारू, अगदी कोणत्याही ब्रॅँडची मुबलक उपलब्ध आहे. .. हजारो कार्यकर्त्यांसह या आणि येथे दारूनेच आंघोळ करा. .. कायद्याच्या राज्याचा विजय असो!’
          कायद्याच्या राज्याची हाकाटी मिरवणा-या सरकारला आपल्या स्वार्थाव्यतिरिक्त काहीच दिसत नसते. सामान्य लोकांच्या प्रश्नांशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नसतो. याची उद्विग्नता म्हणून ‘वांगे अमर रहे’ या पुस्तकामध्ये लेखक गंगाधर मुटे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेमध्ये ‘आदरणीय शरद जोशी यांना’ हे पुस्तक अर्पण केले आहे. यावरूनच लेखकाची नाळ शेतीशी जोडली गेलेली आहे हे लक्षात येते. शेतीच्या सर्व पिकांविषयी बारीकसारीक गोष्टींचा लेखाजोखा गंगाधर मुटे यांनी या पुस्तकात मांडला आहे. आजचा शेतकरी, सावकारशाही आणि सरकारी अधिकारी यांच्याबद्दल अस्खलित उदाहरणानुसार चित्रण केले आहे.

          पुस्तकाची सुरुवातच ‘शेतकरी पात्रता निकष’ या लेखाने केली आहे. सदर लेखामध्ये, शेती हौसेसाठी करावी की उपजीविकेसाठी? याची चर्चा करताना शेतक-याच्या अंगी लागणारे गुण, कायदेशीर गरजा शेतीसाठी लागणारा पैसा यावर समर्पक भाषेत टीपण केले आहे. शेती हे उपजीविकेचे साधन नाही, अशी कबुली देतो. ‘भारतीय सणांचे अनर्थशास्त्र’ या लेखामध्ये प्रत्येकवेळी ऋण काढून शेतक-याला सण साजरे का करावे लागतात, यासंबंधी बोलताना लेखक म्हणतो. ज्या वेळी शेतीच्या कामाचा जोर असतो त्या वेळीच हे सण येतात; परंतु डिसेंबरनंतर म्हणजे त्याच्या हातात पैसा आल्यावर मात्र एकही असा सण नाही की, तिथे पैसा खर्च करावा लागतो. मग शेतकरी नव्याने शेतीसाठी ऋण काढतो. शेतकरी कायम कर्जबाजारी राहावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती पुराणकाळापासून झाली असावी, असे लेखकाला वाटते.

          ‘वांगे अमर रहे’ या लेखामध्ये जास्त पीक घेतले, तर शेतक-याला हाती पूर्णपणे घाटा कसा येतो याचे वास्तव मांडले आहे. महाराष्ट्र सरकारचे कृषिनिष्ठ, शेतीभूषण शेतकरी पुरस्कार कसे कपोलकल्पित थोतांड असते, सरकारी अधिकारी आणि राजकीय पुढा-यांना हाताशी धरून असे पुरस्कार मिळवणारी माणसे खूप आहेत, असे लेखकाने ‘कुऱ्हाडीचा दांडा’ या लेखामध्ये सांगितले आहे.

          ‘शिक्षणाने विद्या आली’ विद्येमुळे मतीही आली. पण मतीमुळे नीती येण्याऐवजी थेट गती आणि वित्त आले की लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल, असा जोतीबांनी केलेला कयासही शेतकरीपुत्रांनी-शुद्रपुत्रांनी उताणा-उघडा-तोंडघशी पाडला, असे समाजव्यवस्थेसंबंधी परखड लेखकाने मत मांडले आहे. शेतकरी महिलांच्या व्यथा ‘भोंडला, हादगा, भुलाबाईची गाणी’ या लेखामध्ये समर्पक गीतांद्वारे सहज उलगडून दाखवल्या आहेत.

          ‘शेतक-यांना फुकट काही देऊ नये’ अशा आशयाचे विधान पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी २०११ मध्ये केले होते. त्यांच्या मताचा समाचार घेताना लेखक म्हणतात, ‘स्वत:च्या शेतीत किंवा विद्यापीठाच्या शेतीत ज्यांना कधी एकरी १५ क्विंटल सोयाबिन पिकवून दाखवता आला नाही, ते स्वत: शेतीतज्ज्ञ म्हणून मिरवत असतात.’ ख-या अर्थाने आज विद्यापीठीय शेतीसंशोधक आणि प्रत्यक्ष शेती यांचा काहीही संबंध राहिलेला नाही, हेच लेखकाने अधोरेखित केले आहे. शेतक-यांच्या समस्यांची जाण बिगरशेतकरी शहरी माणसाला व्हावी, या उद्देशाने एखादे ‘साप्ताहिक’ सुरू करण्यासाठीसुद्धा किती हाल सोसावे लागतात यासंबंधीचे वर्णन ‘वर्धापनदिनाच्या निमित्ताने’ या लेखात केलेले आहे.
          सरकार हे शेतक-यांचे मायबाप असते, मात्र शेतमालाला कमी भाव मिळण्याचे कारण व्यापारी असून तेच शेतकऱ्यांना लुबाडतात, असा सार्वत्रिक समज होता; परंतु शेतक-याने मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण असते, शेतीमालाला त्याचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही एवढे कमी भाव देण्यासाठी सरकार नानाविध क्लृप्त्या वापरून शेतीमालाचे भाव नियंत्रित करते, या शरद जोशींच्या परखड विचाराने लेखक प्रभावित झाले असल्याचे ‘कापसाची दशा, दिशा आणि दुर्दशा’ या लेखात जाणवते.

          सदर पुस्तकामध्ये एकूण २३ लेख असून प्रत्येक लेखाचा केंद्रबिंदू हा शेतकरी समाजच आहे. शेतीसंबंधीची खडान्खडा जाण असल्यामुळेच लेखकाच्या भाषेला एक वेगळीच धार आलेली आहे. शेतक-याच्या आत्महत्या, त्याच्या समस्या, गरजा, राहणीमान, चालीरिती इत्यादीसंबंधी कोणाला अभ्यास करावयाचा असेल, तर हे पुस्तक म्हणजे मैलाचा दगड आहे, यात शंका नाही.

वांगे अमर रहे : गंगाधर मुटे
जनशक्ती वाचक चळवळ
पानं : १२७, मूल्य : १३० रुपये
Prahar
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tags: