रानमेवा अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर म. मुटे's picture
प्रकाशीत: 
प्रकार निवडा


अभिप्राय : - डॉ मधुकर वाकोडे

       श्री गंगाधर मुटे,

               स.न.

              आपण पाठविलेला ’रानमेवा’ मिळाला.

              रानमेवा म्हटले की, त्याची लज्जत काही औरच आणि खरोखर हा संग्रह आस्वाददायी आहे.

              आपल्या अनेक कविता आवडल्यात.

              किती विविधता आहे आपल्या लेखनात.

              गझल, लावणी, अंगाई, बालगीते, तुंबडीगीते, विडंबनगीते, आरती, भावगीत, बडबडगीते, वर्‍हाडी                    

              गीते, नागपुरी तडका - खूप खूप विविधता.

             ....... आणि सारं काही अकृत्रीम.

             आपले मन:पूर्वक अभिनंदन.

रानमेवा काव्यसंग्रहाच्या प्रारंभी श्री गणेश वंदना आणि अखेरीस गणपतीची आरती.

          खूप बरे वाटले.

अभय कविता देखणी तू, वृत्त्त तू, स्वरशब्द तू रे

अंत्ययमका संग दे, ते यमक तू माझे परेशा

         हेच तुमच्या स्वाभाविकतेचे गमक.

आरतीच्या तिसर्‍या कडव्यातील ’आम्ही तुझी लेक’ ऐवजी ’आम्ही तुझे लेक’ (लेकरं या अर्थी) दुरुस्ती केली तर भाषिक दोष दूर होऊन अधिक अर्थपूर्णता येईल.

        एक चांगला संग्रह वाचायला मिळाला, याचा आनंद झाला.

                                  पुनश्च अभिनंदन,

                                                                           - डॉ मधुकर वाकोडे

......... **.............. **............. **..............**............

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    December 30, 2011 10:18 PM

    आदरणीय डॉ. वाकोडे सर
    सप्रेम नमस्कार

    आवर्जून अभिप्राय पाठविल्याबद्दल आभारी आहे.
    आपण सुचविलेली दुरुस्ती इंटरनेट आवृत्तीत करण्यात येत आहे.
    रानमेवाच्या पुढील प्रिंटेड आवृत्तीत नक्की केली जाईल.

    धन्यवाद.

    - गंगाधर मुटे