शुभारंभ

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर म. मुटे's picture
 
जाहीर निमंत्रण 
 
माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग
 
 
आपण येथे वाचू शकता, 
प्रतिसाद देऊ शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता, 
नवीन चर्चा सुरू करू शकता
 
या, एक वेळ अवश्य भेट द्या. .....!
 
*  *  *
नमस्कार मंडळी,
           आज मिती वैशाख कृ.६ रोज सोमवार दिनांक २३ मे २०११. आकाशात ढग गर्दी करायला लागलेले. रोहिनी नक्षत्राचे आगमन अवघ्या काही तासाच्या अंतरावर येऊन ठेपलेले. अशा या मंगलदायी शुभपर्वावर "माझी वाङ्मयशेती" या माझ्या ब्लॉगचा शुभारंभ करताना अत्यंत आनंद होत आहे.
           शेती विषय केंद्रस्थानी ठेऊन एखाद्या शेतकर्‍याने एखादे मराठी संकेतस्थळ निर्माण करून ते चालविणे तसे फ़ारच जिकिरीचे काम आहे. मुद्रीत माध्यमातील लेखन वाचण्याशी सुद्धा जेथे हाडाच्या शेतकर्‍याचे हाडवैर आहे तेथे संगणकिय तंत्रमाध्यमात शेतकर्‍यांना सामील करून पुढील वाटचाल करणे किती महाकठीण काम आहे, याची आम्हांस जाणिव आहे. मात्र परिश्रम आणि चिकाटीने हे कार्य सुरू ठेवल्यास, त्यासाठी तंत्रज्ञान विषयक शिबीर आयोजित करून शेतकरीपुत्रांना प्रशिक्षण दिल्यास, प्रचार आणि प्रसार केल्यास जास्तीत जास्त शेतकरी मंडळींना या उपक्रमात सामिल करून घेता येईल, असा विश्वास आहे.
          अनादीकाळापासून ज्या समाजाच्या पिढोन्-पिढ्या स्वत: अबोल राहून इतरांचे ऐकण्यातच गेल्या, त्या समाजाला बोलते करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून पुढील वाटचाल करायचा आमचा मानस आहे. या कामात आपणासर्वांनी आशिर्वाद आणि सक्रिय सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती आहे.
    या मित्रांनो,

काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, या जरासे खरडू काही, काळ्याआईविषयी बोलू काही.

* * * * * *

प्रतिक्रिया

 • प्रमोद देव's picture
  प्रमोद देव
  May 23, 2011 04:46 PM

  अभिनंदन मुटेसाहेब! तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलात की ते कार्य तडीस नेईपर्यंत स्वस्थ बसू शकत नाही..हे,ह्या संकेतस्थळाच्या निर्मितीने तुम्ही प्रत्यक्षपणे दाखवून दिलंय. हे संकेतस्थळ ज्या मूळ उद्देशाने तुम्ही सुरु केले आहे तो पूर्ण होण्यासाठी, आपले सुशिक्षित शेतकरी बांधव इथे येऊन आपापल्या अनुभवांची देवाण-घेवाण लवकरात लवकर सुरु करोत हीच सदिच्छा!
  संकेतस्थळ सुरळित सुरु राहावे ह्यासाठी माझ्याकडून शक्य असेल ती सर्व मदत मी आपणाला देईन अशी हमी देतो.
  धन्यवाद!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  May 28, 2011 08:36 PM

  धन्यवाद देवसाहेब.
  खरे तर संकेतस्थळनिर्माण वगैरे विषय माझ्यासाठी फारच नविन आहे, पण तुमच्यासारखी काही मंडळींची भरीव मदत होणारच, याच खात्रीने मी सुरूवात केली आहे. Smile

 • mohan's picture
  mohan
  September 29, 2011 09:48 AM

  सुरुवात खुप छाण केलिय मुटे साहेब.
  माझ्या सारख्या नवख्या आणी मनात आलेल्या शब्दांना येथे वाट तरि मोकळी करता येईल.

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  September 29, 2011 03:40 PM

  नक्कीच मनातील भावना व्यक्त करा. स्वागत आहे.