माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली
तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली
ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला औलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली?
घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे भासे असे जसे की, दमछाक दूर झाली
घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली
- गंगाधर मुटे --------------------------------------
ही गझल मला आवडली. मी तुम्हाला विचारले होते की गझल ही वृतातच लिहिली पाहिजे का ?
होय. गझल हा फार पुर्वापार चालत आलेला तंत्रशुद्ध काव्यप्रकार असल्याने गझल ही पूर्णपणे गझलतंत्र पाळूनच लिहावे लागते.
पण प्रयत्नाने गझलतंत्र शिकून आत्मसात करणे मुळीच अवघड नाही.
घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली...
वा गंगाधरजी खुपच प्रासादिक आणि मार्मिकही .. आवडली.
धन्यवाद नवनाथजी.
वाचकांच्या भेटी
प्रतिक्रिया
Gajanan mule
ही गझल मला आवडली.
मी तुम्हाला विचारले होते की गझल ही वृतातच लिहिली पाहिजे का ?
गंगाधर मुटे
होय. गझल हा फार पुर्वापार चालत आलेला तंत्रशुद्ध काव्यप्रकार असल्याने गझल ही पूर्णपणे गझलतंत्र पाळूनच लिहावे लागते.
गंगाधर मुटे
पण प्रयत्नाने गझलतंत्र शिकून आत्मसात करणे मुळीच अवघड नाही.
navnath pawar
घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली...
वा गंगाधरजी खुपच प्रासादिक आणि मार्मिकही .. आवडली.
गंगाधर मुटे
धन्यवाद नवनाथजी.