माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
तुझी सांग येथे दखल कोण घेतो कशाला घशाला उगा त्रास देतो
असामान्य विश्लेषकांच्या भितीने गझल घप्प कपड्यात झाकून नेतो
नवे रोप लावत पुढे चालताना कुणी सांड मागून तुडवीत येतो
पिके फस्त केली फळे पोखरूनी कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो
अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी कुणाच्याच बापास ना घाबरे तो
- गंगाधर मुटे …………………………………… वृत्त : भुजंगप्रयात
अगदी खरंय! अशीच परिस्थिती आहे सगळीकडे. वास्तववादी गजल!
प्रतिसादाबद्दल आभारी आहे देव साहेब.
वाचकांच्या भेटी
प्रतिक्रिया
प्रमोद देव
अगदी खरंय! अशीच परिस्थिती आहे सगळीकडे.
वास्तववादी गजल!
गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्दल आभारी आहे देव साहेब.