भावात्म काव्यात्मकतेचा 'गोडवा’

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
प्रा. मधुकर पाटील's picture
प्रकाशीत: 
- - - - - - - -
                                                                                                        प्रा. मधुकर पाटील
                                                                                                        बोरीवली (पश्चिम),

                                                                                                        मुंबई - ४०० १०३ प्रिय कवी गंगाधर मुटे,       तुमचे-आमचे प्रिय मित्र प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांनी पाठविलेला तुमचा आंबटगोड "रानमेवा" मिळाला. मन:पुर्वक आभार तुमचे आणि प्रा. सुरेशचंद्राचे. ’आंबटगोड’ म्हटले या रानमेव्याला कारण यामध्ये उपहास-उपरोधाचा ठसका देणारा आंबटपणा आहे आणि भावात्म काव्यात्मकतेचा ’गोडवा’ ही आहे. शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना असे ’शेतकरी-भोग’ भोगताही तुम्ही काव्य ’जगत’ आहात याबद्दल अभिनंदन. आणि सत्य ’आत्मगत’ आणि ’समूहगत’ ही - असाच प्रत्यय देणारे.          अंगारमळा-आंबेठानच्या ख्यातनाम शरद जोशी यांच्यापासून पुणे-मुंबई-अहमदनगर-अकोला ते अगदी हॉंगकॉंग-कुवैत-आस्ट्रेलिया-अमेरिका येथपर्यंतच्या अनेक जाणत्यांनी तुमच्या ’रानमेव्या’ला दाद दिली आहे - त्यात तुम्हाला अज्ञात असलेल्या एका रसिकाची भर- तुमच्या खास आवडलेल्या कविता : बळीराजाचे ध्यान, माणूस, हे गणराज्य की धनराज्य?, अट्टल चोरटा मी, सरबत प्रेमाच्या नात्याचं, शल्य एका कवीचे, कुठे बुडाला चरखा?, धकव रं शामराव, आंब्याच्या झाडाला वांगे, लकस-फ़कस, झ्यामल-झ्यामल, तरी हुंदक्यांना गिळावे किती?, अंगार चित्तवेधी. तुमच्या कवितेतील ’कवितांना’ जन्म देणार्‍या प्रतिमा: गगनावरी तिरंगा - ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे * तारांगणे उद्याची - कक्षा तुझी असावी * छप्पर उडल्या संसारात ब्रह्मपुत्रा वाहते तेल मिरची शिदकुट पाण्यावरती पोहते ....! * विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे * पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा * आकाश अंथरोनी, तार्‍यास घे उशाला बाहूत सूर्यचंदा, पाताळ पायशाला * लावती घामाला किंमत सस्ती त्वेषाने अंबर चिरू द्या की रं ......! * उषेला बांग देऊ द्या की रं ......! * जीवाचा आटापिटा हाच त्यांचा बायोडाटा * अरे माणूस माणूस कसं निसर्गाचं देणं? गुण श्वापदाचे अभये नाही मानवाचं लेणं ......! * ताई-दादा राबताती, पिकताती माणिकमोती जसं कैवल्याचं लेणं, ओंब्या-कणसं झुलताती * चंद्रास ग्रासताना अंधार घोर झाला तुमच्या कवितेतील सुंदर कल्पनाविलास: अट्टल चोरटा मी * सरबत...... प्रेमाच्या नात्याचं * विलाप लोकसंख्येचा तुमच्या कवितेतील शाब्दलय: