चाकोरीबाहेरचं लिहायचा प्रयास

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गिरीश कुलकर्णी's picture
प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

चाकोरीबाहेरचं लिहायचा प्रयास

गंगाधर मुटे हे नाव एक दिवस असंच मायबोलीवर (जिथे माझा नेहमीच राबता असायचा-असतो) झळकलं... शेतकर्‍यांच्या प्रश्नावर तळमळीनं लिहिणारा असा कोणीतरी मायबोली परिवारात सामील झाला असं माझ त्यांच्याबद्दलच पहिलं-वहिलं मत होतं! शहरी अनुभवांची रेलेचेल असलेल्या मायबोलीवर हा नवा चेहरा सगळ्यांनीच सहर्ष स्वीकारला. शेतकर्‍यांवर-त्यांच्या प्रश्नांवर लेख लिहिणारे मुटे धीरे-धीरे मायबोलीसारख्या आंतरजालीय व्यासपीठावर बरंच काही लिहायला लागले... कविता हे मात्र त्यातलं सगळ्यात मोठं डबुलं होईल हे मला त्यांची पहिली कविता वाचतांना वाटलं नव्हतं...

मुट्यांची पहीली कविता मी केंव्हा वाचली ते आता आठवत नाही पण मुटे एकदम डोळ्यात भरले ते त्यांच्या ’'नागपुरी तडका" या प्रकारातील कवितांमुळे. मुटेंच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातला earthy इंटेलीजन्स अन् त्याचा कवितांमधे केला गेलेला उपयोग. माझ्यासारख्या मराठी साहित्यापासून दशकभरापासून दूर गेलेल्या माणसाला त्यांच्या कवितांमधला हा भाग पुरेपुर भावला. तेच झालं इतर शहरी अभिरुचीत वाढलेल्या वाचकांचं अन् त्यांनी मुट्यांना खूप उत्तेजन दिलंही.

मी पूर्वी कधीही काव्यलेखन केलं नव्हतं हे मुटेंच वाक्य मी बरेचदा ऐकलंय. पण त्या उशिरामुळे त्यांच्या लेखनात एक प्रगल्भता जाणवते. मुट्यांनी मग कविता, लावणी, अभंग, लोकगीतं या सगळ्या प्रांतात केलेल्या मुशाफिरीचा मी वाचक अन् अवलोकक राहिलोय. मुट्यांनी मला अतिशय प्रभावित केलं ते त्यांच्या गझल शिकण्याच्या वेडामुळे. त्यांनी आंतरजालावर जेव्हढे तज्ज्ञ लोक असतील त्यांना प्रश्न विचारुन आपलं तांत्रिक ज्ञान वाढवलं. जे काही आंतरजालावर उपलब्ध होतं ते मुट्यांनी पक्कं आत्मसात केलं अन्‍ माझ्यासारख्या इतरांनाही वेळोवेळी पुरवलं. मुटेंची गझल नवी आहे पण त्यात चमक आहे. चाकोरीबाहेरचं लिहायचा प्रयास आहे. तसंच त्यांच्या कवितेविषयीही ...... त्यांची कविता प्रामाणिक आहे, परिणाम साधणारी आहे.

माझ्या इंग्रजी माध्यमातल्या मुलानं कबीरनं जेंव्हा, "श्याम्यानं इचीभैन कहरच केला... मुंबैले बिपाशासाठी लुगडं घेऊन गेला" हे मुट्यांनी रेकॉर्ड करुन पाठवलेलं त्यांच नागपुरी तडक्याचं सँपल ऐकलं तेंव्हा तो त्यांच्या प्रेमातच पडला... माझ्या कविता कधीही न ऐकणारा माझा मुलगा मुट्यांच्या कवितेशी मात्र चटकन समरसून गेला. हे त्यांच्या कवितेचं यश आहे. मुट्यांचा तंत्रज्ञानाचा वापर अन् ते जास्तीत जास्त वापरण्याकडचा कल अतिशय कौतुकास्पद आहे.

गंगाधरराव मुटे अजून बरच काही लिहिणार आहेत ... "रानमेवा" ही तर फक्त सुरुवात आहे! माझ्यासाठी ही सुरुवात उत्साहवर्धक आहे. कारण यातनं साहित्य लोकाभिमुख व्हायला खूप मदत होणार आहे.

गंगाधरराव मुटेंना माझ्या हार्दिक शुभेच्छा !!!!

सस्नेह ,
गिरीश कुलकर्णी

१, हार्बर रोड, वानचाय, हाँगकाँग
http://maitreyaa.wordpress.com

....................... **............. ......... **.............. **.............