माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
आधी खाते भाव जराशी मग ती घेते नाव जराशी
चाल रडी पण; लोभसवाणी खेळ आणखी डाव जराशी
आढे वेढे हवे कशाला थेटच दे ना ठाव जराशी
खुळ्या स्मृतींना जपण्यासाठी निदान दे तू घाव जराशी
उत स्वप्नांचा पाडा आला लगबग ये चल घाव जराशी
मम श्वासाची कपोलभाती ओठावरती लाव जराशी
अभय नशेची सोज्वळ मदिरा दे चढण्याला वाव जराशी
- गंगाधर मुटे 'अभय' ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचकांच्या भेटी