कथा एका आत्मबोधाची...!!

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture
प्रकाशीत: 
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)

कथा एका आत्मबोधाची...!!

तो सर्प...! जन्मत: बिनविषारी होता
फ़ुत्कारणे त्याच्या गावी नव्हते
आचरण त्याचे सरळमार्गी....कुणाला न दुखावणारे
तेव्हा त्याच्यावर सगळे..... तुटून पडायचेत
कोल्हे-लांडगे खेकसायचेत... मुंग्या-माकोडे चावायचेत
अज्ञान-सज्ञान, सभ्य-असभ्य, शिक्षित-अशिक्षित
सुसंस्कृत-सुसंस्कारी ........ झाडून सगळीच
त्याला खडे मारायचीत
तो रडायचा....... केविलवाणी अश्रू ढाळायचा
कळवळायचा... असह्य वेदनांनी... कण्हायचा
पण दुसऱ्याच्या वेदनांवर पाझरेल... तर
ती जगरूढी कसली?
मग तो स्वबचावासाठी
जीव मुठीत घेऊन पळायचा.....आणि तरीही.....
पाठलाग करणारी पिच्छा पुरवायची....
खिदळत..... दात वेंगाडत...!
आणि मग एक दिवस........ एका निवांत क्षणी
त्याला आत्मबोध झाला.........!!
विचाराला कलाटणी मिळाली... कळले की
आक्रमणाला उत्तर बचाव नसते...
तलवारीला उत्तर ढाल नसते....
'अहिंसे'चे अर्थ भेकडपणात नसते.
"आक्रमणाला आक्रमणानेच" आणि
"तलवारीला तलवारीनेच" उत्तर द्यायचे असते....!!!
आणि मग....... आणि मग त्याने.....
त्याने श्वास रोखला..... आणि सगळे बळ एकवटून.....
असा काही फ़ुत्कार सोडला की...........!!!!
आता......
कोल्हे-लांडगे कान पाडून पळत होती,
कुत्रे शेपट्या खाली करून पळत होती,
आणि माणसे?.... माणसे जीव मुठीत घेऊन....
जीवाच्या आकांताने सैरावरा पळत होती...!!!!
कारण.........कालचा बिनविषारी साप
अभयपणे आजचा....
जहाल विखारी नाग बनला होता.... ...!!!!!

गंगाधर मुटे
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
....................................................................