माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
घामाची कत्तल जेथे, होते सांज सकाळी तुतारी फुंकते तेथे, माझी गझल निराळी
शब्दांची गुळणी नोहे, नव्हेच शब्द धुराडा निद्रिस्थी जागवण्याला, गातो शेर भुपाळी
एकेका आरोपीची उला पकडतो गच्ची सानीच्या लाथडण्यावर पिटती मिसरे टाळी
लढवैय्या आशय माझा करतो तांडव तेथे जन्माला येते जेथे, ती काळरात्र काळी
युगानुयुगे ते बोलले, ऐकत आलो आम्ही
वाचकांच्या भेटी