पहिले अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन - संमेलनपूर्व घडामोडी

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture
पहिले अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन

           ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी,हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयचकोडेच आहे.
           गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेलीनाही किंवा त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारणसांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे एकही पुस्तक साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही. विदर्भप्रदेश गेल्याअनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये होरपळत आहे पण शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणीकरून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्राला अत्यंत लाजिरवाणीच म्हटलीपाहिजे.
             कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी,मराठी साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता याचा उहापोह करण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीआणि शेतीक्षेत्राला मराठी साहित्यक्षेत्राप्रती असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी आणि साहित्यक्षेत्रातील ही शेतीसाहित्याची उणीवभरून काढण्यासाठी शेतीशी प्रामाणिक व कटीबद्ध असणार्‍या लेखक – कवी - गझलकारांनी एकत्र येऊन अ. भा. मराठी शेतकरी साहित्यचळवळ स्थापन केली असून पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक : २८ फ़ेब्रुवारी २०१५ व १ मार्च २०१५
स्थळ   : मातोश्री सभागृह, आर्वी नाक्याजवळ, वर्धा

कार्यक्रमाची रुपरेषा
शनिवार २८ फ़ेब्रुवारी २०१५

उदघाटन सोहळा : ११.००  ते  ०१.३०

संमेलनाचे अध्यक्ष :  मा. शरद जोशी
उदघाटक :  मा. इंद्रजित भालेराव, ज्येष्ठ कवी
प्रमुख अतिथी :  मा. भीमराव पांचाळे, गझलनवाज, मा. संजय पानसे
स्वागताध्यक्ष :  सौ.सरोजताई काशीकर
प्रास्ताविक :  गंगाधर मुटे, कार्याध्यक्ष
सूत्रसंचालन :  प्रा. मनिषा रिठे
शेतकरी नमनगीत:  संगीतकार मा. सुधाकर आंबुसकर व  संच
पुस्तक प्रकाशन: “नागपुरी तडका” काव्यसंग्रह

मध्यावकाश :  स्नेहभोजन

परिसंवाद – १      वेळ : दुपारी ०३.०० ते सायं ०४.३०

विषय : शेतकरी चळवळीच्या उदयापूर्वीचे आणि नंतरचे मराठी साहित्य
अध्यक्ष: डॉ. शेषराव मोहिते
सहभाग: डॉ. दिलीप बिरुटे,  प्रा. डी. एन.  राऊत
सूत्रसंचालन: प्रा.  राजेन्द्र मुंढे

परिसंवाद – २    वेळ : सायं ०४.३० ते ०६.००

विषय : आत्महत्त्या करण्यापूर्वी एका शेतकर्‍याने लिहून ठेवलेल्या पत्राचे त्याच्या विधवा पत्नीद्वारा वाचन
अध्यक्ष: डॉ. मानवेंद्र काचोळे
प्रस्तावना: कडुआप्पा पाटील
सहभाग: अ‍ॅड सुभाष खडांगळे, रवी देवांग
सूत्रसंचालन: मधुसुदन हरणे

मध्यावकाश : चहा

परिसंवाद – ३   वेळ : सायं ०६.१५ ते ०७.३०

विषय : शेतकरी स्त्री आणि मराठी साहित्यविश्व
अध्यक्ष : विद्यूत भागवत
सहभाग : प्रज्ञा बापट, शैलजा देशपांडे
सूत्रसंचालन : गीता खांडेभराड

शेतकरी गझल मुशायरा
वेळ : सायं ०७.३०  ते रात्री ०९.००

अध्यक्ष:  मा. भीमराव पांचाळे, गझलनवाज
सहभाग: विनिता पाटील (डोंबिवली), मारोती पांडूरंग मानेमोड (नांदेड), निलेश कवडे (अकोला), राज पठाण (अंबाजोगाई), डॉ. कैलास गायकवाड (मुंबई) कमलाकर देसले (नाशिक) नजीम खान, प्रमोद चोबितकर (बुलढाणा), मसुद पटेल, आबेद शेख, गजानन वाघमारे, विनय मिरासे, (यवतमाळ), वीरेंद्र बेडसें,  विजय पाटील (धुळे), नितीन देशमुख, लक्ष्मण जेवणे, गिरिश खारकर, पवन नालट (अमरावती), सुमती वानखेडे, विजय राऊत, विनोद मोरांडे (नागपूर), रवी धारणे (चंद्रपूर), अनंत नांदुरकर, ललित सोनोने, दिलीप गायकवाड, गंगाधर मुटे (वर्धा)
सूत्रसंचालन : विद्यानंद हाडके आणि प्रफ़ुल भुजाडे

मध्यावकाश : स्नेहभोजन
सांस्कृतिक सत्र : रात्री ९.३०
श्रमशक्ती कलाअविष्कार औरंगाबाद द्वारा निर्मित एकांकिका
“उगवला नारायण”
* संहितालेखन : नवनाथ बंडू पवार       * दिग्दर्शन : गोपाळ पळसकर  
* संगीत : रवींद्र स्वामी                    * नेपथ्य :  मधुकर कुलकर्णी
* कलाकार : गोपाळ पळसकर, वैशाली, कुलकर्णी, नागनाथ काजळे, किशोरी नाईक,  बागेश्री सराफ

रविवार ०१ मार्च २०१५

परिसंवाद – ४  वेळ : सकाळी ०८.३०ते  १०.३०

विषय : शेतीसाहित्य आणि पत्रकारिता
अध्यक्ष: अनिल महात्मे, जेष्ठ पत्रकार
सहभाग: सुनिल कुहीकर, तरुण भारत, अविनाश दुधे, संपादक, पुण्यनगरी, अमरावती, राजेश राजोरे, संपादक देशोन्नती, बुलडाणा, श्रीपाद अपराजित, संपादक, महाराष्ट्र टाइम्स, नागपूर
सूत्रसंचालन : प्रमोद काळबांडे, सहसंपादक, सकाळ, नागपूर
प्रकाशन: “सारस्वतांचा एल्गार” स्मरणिकेचे प्रकाशन

मध्यावकाश : अल्पोपहार

परिसंवाद – ५     वेळ : सकाळी ११.०० ते  दुपारी १२.३०

विषय : शेती आणि मराठी साहित्यविश्व
अध्यक्ष: भास्कर चंदणशिव
सहभाग: सुधाकर जाधव,  मुरली खैरनार
सूत्रसंचालन : गंगाधर मुटे

शेतकरी कवीसंमेलन      वेळ :  दुपारी १२.३०  ते  ०२.००

अध्यक्ष:  डॉ. विट्ठल वाघ
सहभाग: विनिता माने-पिसाळ, रविंद्र कामठे (पुणे), किशोरी नाईक, कौतुक शिरोडकर (मुंबई), डॉ संजीवनी तडेगावकर, प्रा. जयराम खेडेकर (जालना), दिलीप भोयर, विजय विल्हेकर, विश्वजित गुडधे, हनुमान बोबडे, प्रशांत वावगे, (अमरावती), नवनाथ पवार (औरंगाबाद), दिलीप चारठाणकर (परभणी), प्रा विट्ठल कुलट, मंगेश वानखडे,  प्रवीण हटकर (अकोला), दीपक चटप (चंद्रपूर), संजय इंगळे तिगांवकर, प्रा. मनिषा रिठे, डॉ. रविपाल भारशंकर, धिरज ताकसांडे (वर्धा), डॉ विशाल इंगोले (बुलढाणा), श्रीकांत धोटे (सिंधुदुर्ग), विजय चव्हाण (लातूर), दर्शन शहा (कर्नाटक), विजय सोसे, गजानन मते, चाफ़ेश्वर गांगवे (वाशिम)
सूत्रसंचालन : किशोर बळी

मध्यावकाश : स्नेहभोजन

समारोपीय सत्र   वेळ : दुपारी ०३.०० ते सायं ०५.३०

विषय : शेतकरी आत्महत्या, राजकारण आणि  साहित्यविश्व
अध्यक्ष: अ‍ॅड वामनराव  चटप
सहभाग: गुणवंत  पाटील हंगरगेकर, विजय निवल, राम नेवले, अ‍ॅड दिनेश शर्मा
 सूत्रसंचालन : संजय इंगळे तिगांवकर

पुरस्कार वितरण आणि बळीराजाची आरती

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

: निमंत्रण पत्रिका :


sahity sanmelan

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

sahity sanmelan

प्रतिक्रिया

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  December 09, 2014 05:02 AM

  आज जाहीर करताना अत्यंत आनंद होतोय की, पहिल्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून स्थान भूषविण्यास शेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक व थोर अर्थतज्ज्ञ मा. शरद जोशी यांची स्विकृती मिळालेली आहे. उद्घाटन सत्राला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची सुप्रसिद्ध कवी श्री इंद्रजित भालेराव आणि गझलनवाज श्री भिमरावदादा पांचाळे यांची सुद्धा स्विकृती मिळालेली आहे.

  अधिक माहिती येथे >>>>> http://www.baliraja.com/node/724

 • गंगाधर एम मुटे's picture
  गंगाधर एम मुटे
  December 09, 2014 10:49 AM

  Maharasthra Times

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  December 12, 2014 06:15 PM

  भास्कर

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  December 12, 2014 06:17 PM

  तरुण भारत

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  December 12, 2014 06:19 PM

  Lokmat

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  December 12, 2014 06:23 PM

  Sakal

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  December 12, 2014 10:07 PM

  Punyanagari

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  December 13, 2014 12:23 AM

  नमस्कार,
  पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलनामध्ये "शेती आणि शेतकरी" या विषयावरील रचना सादर करण्यासाठी कवीसंमेलन आणि गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आलेले आहे.या कवीसंमेलन किंवा गझल मुशायर्‍यात सहभागी होऊ इच्छीणार्‍या कवी आणि गझलकारांनी आपल्या संपूर्ण माहितीसह abmsss2015@gmail.com या इमेलवर मेल करावी.

  इमेलवर मेल करण्याची अंतिम मुदत २५ डिसेंबर २०१४. कृपया नोंद घ्यावी.

  पहिले अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलन
  दिनांक : २८ फ़ेब्रुवारी २०१५ व १ मार्च २०१५
  स्थळ : मातोश्री सभागृह, आर्वी नाक्याजवळ, वर्धा

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  December 16, 2014 11:33 AM
 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  December 16, 2014 11:33 AM

  Loksatta

 • गंगाधर एम मुटे's picture
  गंगाधर एम मुटे
  January 07, 2015 07:24 PM

  आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकालाचा शुभमुहुर्त
  नमस्कार मंडळी,
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून आपण १ नोव्हेंबर २०१४ ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधीत आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. स्पर्धा जाहिर करतेवेळी २६ जानेवारी २०१५ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, असे घोषीत केले होते.
        परंतु कळवितांना अत्यंत आनंद होतोय की सदर निकाल विहित मुदतीच्या आतच म्हणजे १० जानेवारी २०१५ रोजी जाहिर करण्यात येणार आहे. निकाल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.shetkari.in आणि www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाणार आहे.
  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक-कविंचे मनपूर्वक आभार व संभाव्य विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन....!!

 • गंगाधर एम मुटे's picture
  गंगाधर एम मुटे
  January 10, 2015 12:37 PM

   आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४ : निकाल

  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कविंचे मनपूर्वक आभार  :namo:

  आणि

  सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!!  Congrats

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  January 19, 2015 10:35 PM

  नमस्कार,

             पहिल्या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनाची कच्ची रुपरेषा व कार्यक्रमपत्रिका अवलोकनार्थ सादर करण्यात येत आहे. वाचकांनी तसेच संबंधितांनी काही तृटी आढळल्यास इथे प्रतिसादात किंवा मला वैयक्तिक मेल, फ़ोन अथवा sms करून ही माहितीपत्रिका प्रिंटीगला जाण्यापूर्वी निदर्शनास आणून द्याव्यात, ही विनंती.

  sanmelana

  --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  sanmelan

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  January 20, 2015 11:58 PM

  सारस्वतांचा एल्गार

        वर्धा येथे २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित पहिल्या अ. भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने "सारस्वतांचा एल्गार" ही स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे.

      शेती आणि शेतकरी या विषयावरील  "सारस्वतांचा एल्गार" या शिर्षकाला साजेसे गद्य अथवा पद्यलेखन स्मरणिकेसाठी मागविण्यात येत आहे. आपले लेखन जास्तीत जास्त ५ फ़ेब्रुवारी २०१५ पर्यंत पोचेल अशा बेताने abmsss2015@gmail.com  या मेलवर किंवा खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवावे. ही विनंती

  Gangadhar Mute
  Arvi Chhoti - 442307
  Tah - Hinganghat
  Distt - Wardha ( M.S )

  -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  February 08, 2015 03:17 PM

  sahity sanmelan

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  February 08, 2015 03:19 PM

  sahity sanmelan

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  February 08, 2015 03:20 PM

  सहित्य संमेलन

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  February 14, 2015 12:21 AM

  sovenir

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  February 14, 2015 12:36 AM

  Hivad

  ******

  देशोन्नती

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  February 22, 2015 04:04 PM

  साहित्य संमेलन बॅनर