माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
सावध व्हावे हे जनताजन
मळभटं सारी द्यावी झटकून सावध व्हावे हे जनताजन ….॥१॥
कुणी फ़ुकाने लाटती पापड कुणी झोपला ओढुनी झापड मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी चिडीचिप झाला मूग गिळून ….॥२॥
आग लागुनी जळता तरूवर म्हणती आहे मम घर दूरवर सोकाविती मग कोल्हे-दांडगे आणिक पिती रक्त पिळून ….॥३॥
किमान थोडा लगाम खेचा नांगी धरुनी त्यांची ठेचा झोपेचे हे सोंग फ़ेकूनी अभय पहा तू डोळे उघडून ….॥४॥
गंगाधर मुटे ……………………………………….
वाचकांच्या भेटी