माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
हिमालयाची निधडी छाती….
चंद्र मेघात झाकलेला अन, नदीस पूर होता भटकल्या होडीत ’ती अन मी’ किनारा दूर होता..
ढळलेल्या सांज समयासी, खुपच लांब बगीचा तो धोतर्याचे फ़ूल तिला दिले मी, काय कसूर होता ?
ती मला गवसलीच नाही, हृदय जळतच राहीले बर्फ़ात लपेटले हृदया, तरी निघत धूर होता..
झेलली किती आक्रमणे, माय मराठीने माझ्या ना डगमगली कदापि, जो तीचा शब्द शूर होता..
धडकले ते रक्तबंबाळ झाले, युद्धखोर ते टक्कर दिली! हा हिमालयाचा निधडा ऊर होता..
गंगाधर मुटे …………………………………………………………
वाचकांच्या भेटी